Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित?? आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha Election 2024) भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उदयनराजे गेल्या ३ दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहे. आज रात्री उशिरा दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जाहीर होऊ शकतो. एकूणच उदयनराजे यांची दिल्ल्लीवारी यशस्वी झाल्याचे बोललं जात आहे.

खरं तर उदयनराजे यांनी अजित पवारांच्या घडयाळावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव यापूर्वी भाजपने दिला होता, मात्र राजेंनी तो साफ फेटाळून लावला. भाजपच्या कमळ चिन्हांवरच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची उदयनराजेंची इच्छा होती. परंतु भाजपच्या यादीत महाराष्ट्रातील २० जागांबाबत घोषणा होऊनही त्यात उदयनराजेंचे नाव नसल्याने त्यांचे कार्यकर्त्ये आक्रमक झाले होते. त्यानंतर राजेंनी थेट दिल्ली गाठली आणि आता त्यांचे तिकीट जवळपास निश्चित झाल्याचे बोललं जात आहे.

राजेंसमोर पवार कोणाला उतरवणार?

दरम्यान, भाजपने जर उदयनराजे भोसले याना सातारा लोकसभेसाठी तिकीट जाहीर केलं तर महाविकास आघाडी कडून शरद पवार त्यांच्यासमोर कोणाला उमेदवारी देणार हे पाहावं लागेल. उदयनराजे यांच्यासारखा तगडा उमेदवार रिंगणात असल्यास शरद पवार पुन्हा एकदा आपले जिवलग मित्र आणि साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. श्रीनिवास पाटील प्रचंड अनुभवी असून कराड- पाटण भागातून येतात. या मतदारसंघाचे नेतृत्व करताना त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क हा लक्षात घेण्याजोगा आहे.  २०१९ साली श्रीनिवास पाटील यांनी तब्बल 87,000 मतांनी विजय मिळवत उदयनराजेंचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे राजेंना शह देण्यासाठी पवार पुन्हा एकदा आपला हुकमी एक्का बाहेर काढू शकतात.