मानसपुत्र म्हणणाऱ्यांचे नेतृत्व साडेतीन जिल्ह्यापुरते; उदयनराजेंचा पवारांवर हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ असलेल्या सातारा लोकसभा (Satara Lok Sabha Election 2024) मतदारसंघासाठी ७ मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. साताऱ्यात महायुतीकडून भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार. दोन्ही बाजूनी प्रचाराला जोरदार सुरुवात सुद्धा झाली असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. त्यातच आता उदयनराजे भोसले यांनी थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाबोल केलाय. मानसपुत्र म्हणणाऱ्यांचे नेतृत्व साडेतीन जिल्ह्यापुरते आहे असा टोला लावत पवारांनी ४० सभा घ्याव्यात असे आव्हान उदयनराजेंनी दिले.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर मतदार संघातील संवाद मेळाव्याचे फोटो शेअर करत शरद पवारांवर घणाघात केला. सातारा लोकसभा निवडणूक प्रचार दौरा अनुषंगाने आज पाटण तालुक्यातील मारूल हवेली विभागातील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. मानसपुत्र म्हणणाऱ्यांचे नेतृत्व साडेतीन जिल्ह्यापुरते, सातारा लोकसभा मतदार संघात 40 सभा घ्या असं आव्हान उदयनराजेंनी शरद पवारांना दिले. तसेच रयत शिक्षण संस्थेची घटना बदलणाऱ्यांना धडा शिकवणार. रयत शिक्षण संस्थेच्या घटनेमध्ये राज्याचा मुख्यमंत्री हा संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असला पाहिजे असा उल्लेख आहे. मात्र ही घटना बदलून ती आपल्या ताब्यात ठेवणाऱ्यांना धडा शिकवणार आहे असेही ट्विट उदयनराजेंनी केलं.

२०१९ च्या पोटनिवडणुकीत पवारांनी उदयनराजेंचा पराभव केला होता –

खरं तर २०१९ ची लोकसभा निवडणूक उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढवली आणि ते विजयी सुद्धा झाले होते, मात्र त्यानंतर अवघ्या ४ महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी साताऱ्यात जातीने लक्ष्य घालत उदयनराजे यांच्या विरोधात श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली आणि पावसातील त्या सभेने लोकसभेचे संपूर्ण चित्रच बदललं. श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंना धूळ चारत नवा इतिहास घडवला. श्रीनिवास पाटील यांच्याकडून झालेला पराभव उदयनराजेंच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच, यंदाच्या निवडणुकीत मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उदयनराजे सज्ज झाले आहेत.