…तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; सभागृहात उद्धव ठाकरे आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीमावादाच्या प्रश्नावरून हल्लाबोल केला. “कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रात अध्यापही ठराव का केला जात नाही. न्याय प्रविष्ट असेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा,” अशी प्रमुख मागणी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात केली.

आज पार पडलेल्या चर्चेत कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्नाटक सरकार व तेथील मुख्यमंत्री सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडत आहे. परंतु सीमावादावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी ब्र तरी तोंडातून काढला का? सीमाप्रश्न सुरू असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज होती का? दिल्लीत जाऊन ते पुन्हा सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार आहे का? असा सवाल ठाकरेंनी सभागृहात केला.

सीमाप्रश्न हा भाषावार प्रांत रचनेचा विषय नाही. माणुसकीचा हा विषय आहे. खालच्या सभागृहात काहीजण म्हणतात आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत. त्यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात होतात आता तुम्ही सीमा ओलांडली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले. खरतर हा विषय सुरु असताना दिल्लीला जाणे योग्य आहे का? मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी केलं काय? आदी प्रश्नाचा भडीमार यावेळी ठाकरेंनी केला.