“मोगँबो खुश हुआ” ; उद्धव ठाकरेंची अमित शहांवर बोचरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यांनतर उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेला चांगलीच धार आली आहे. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख चक्क “मोगँबो” असा केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काल पुण्यात कोणी आलं होतं. त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ,” असं म्हणत हे मोगॅम्बोच आहेत अशी जहरी टीका ठाकरेंनी नाव न घेता अमित शहांवर केली. तुम्ही मिस्टर इंडिया चित्रपट आठवला तर त्यात त्यातील मोगॅम्बोला हेच हवे होते. देशात आपापसात लढाई व्हावी. लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर जोरदार प्रहार केला.

मी भाजपला सोडलं आहे, हिंदुत्त्वाला नाही. भाजपने आमच्यासोबत 2014 मध्ये युती तोडली आणि 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाचा शब्द फिरवला. भाजपनेच मला काँग्रेस सोबत युती करण्यास भाग पाडले. मी काँग्रेसबरोबर युती केली म्हणून माझ्यावर टीका करणाऱ्यांनी जम्मू काश्मीर मध्ये मुफ्ती सोबत युती केली तेव्हा यांचं हिंदुत्त्व कुठे गेलं होत असा बोचरा सवाल उद्धव ठाकरेंनी केला .