Saturday, March 25, 2023

उद्धव ठाकरेंनी भर सभेत ऐकवली फडणवीसांची ‘ती’ क्लिप; दिले खुलं आव्हान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची वीजबिला बाबतची जुनी ऑडिओ क्लिप दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर कडक शब्दात हल्लाबोल केला.

फडणवीसांच्या त्या ऑडिओ मध्ये नेमकं काय आहे ?

मध्यप्रदेश सरकारने ६५०० कोटी देऊन बिजबिले स्वतः भरत शेतकऱ्यांची वीजबिले माफ केली आहेत. महाराष्ट्रात मात्र रोज सावकारी पद्धतीने वीजबिले वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारनेही मध्यप्रदेश प्रमाणे शेतकऱ्याची वीजबिले माफ करावी अशी मागणी फडणवीसांनी ते विरोधी पक्षनेते असताना केली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खुलं आव्हान देत हिंमत असेल आता वीज बिल माफ करून दाखवा. आता होऊनच जाऊ द्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीजबिले माफ करा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. गेल्या आठवड्यात हे हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत . त्यांनी उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं… अन् हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून निघाले, असा टोला ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला.