….म्हणून त्यावेळी राजीनामा दिला; ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोट ठेवले. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आज आम्ही पुन्हा त्यांचं सरकार आणलं असत अस कोर्टाने म्हंटल होत. त्यानंतर आपण राजीनामा का दिला याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोर्टाच्या निर्णयावर सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, जरी कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला हे चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण मी माझ्यासाठी ही लढत नाही. माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.

सर्व काही देऊन त्यांनी माझ्या पाठीत वार करावा, माझ्यावर अविश्वास आणावा हे मला पटलं नाही.  विश्वासघात करणाऱ्यांकडून जर मला विश्वासदर्शक अविश्वासदर्शक ठरावाबाबत विचारलं जात असेल तर ते चुकीचं आहे, अस उद्धव ठाकरेंनी म्हंटल. तसेच  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल तर जसा मी दिला तसा त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.