Monday, January 30, 2023

ठाकरेंना युती सरकारमध्येच मुख्यमंत्री व्हायचं होत; माजी मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १९९६ च्या युती सरकारच्या काळातच मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांनी याबाबत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आग्रह धरण्यास आम्हांला सांगितलं होत असा खळबळजनक दावा शिवसेनेचे माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटात असलेले सुरेश नवले यांनी केला आहे. tv९ या वृत्तवाहिनीशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे.

सुरेश नवले म्हणाले, 1996 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. मनोहर जोशी यांना पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, मात्र त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला, त्यावेळी त्यांची मुख्यमंत्री होण्याची अतृप्त इच्छा पूर्ण झाली.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी मला, अर्जुन खोतकर आणि चंद्रकांत खैरे याना बाळासाहेब ठाकरेंकडे पाठवलं होत आणि त्यांच्या कानावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करण्यास सांगितले होते. त्यांनतर बाळासाहेबांनी आम्हाला उलट प्रश्न करत विचारलं की तुम्ही उत्स्फूर्तपणे सांगताय की तुम्हाला कोणी सांगायला लावतंय, पण आम्ही त्यांच्याशी खोटं बोललो, की आम्हाला कोणी सांगितलेलं नाही, पण आम्हाला सांगणारे उद्धव ठाकरेच होते, त्याप्रमाणेच आम्ही मागणी केली कि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावा असेही सुरेश नवले यांनी म्हंटल.