ही तर आता सुरुवात, भविष्यातील लढाईची चिंता नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या विजयावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आजच्या या निवडणुकीत विजयाची मशाल भडकवली आहे. निवडणुकीपूर्वी अनेक कपट कारस्थानाने झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मात्र, चिन्हापेक्षा वृत्ती महत्वाची असते. भाजपकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणं मूर्खपणाचं ठरेल. मात्र, आजच्या विजयापासून हि सुरुवात आहार त्यामुळे आम्हाला आता भविष्यातील लढाईची चिंता नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. आमचं नाव आणि चिन्ह ज्यांच्या मागणीवरुन गोठवलं ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र, त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असतील तर ही मतं त्यांना मिळाली असती.

मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.