पेपरलीग प्रकरणामुळे UGC-NET परीक्षा रद्द!! शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| प्राध्यापक पदासाठी आणि JRF साठी घेण्यात येणारी UGC-NET परीक्षा बुधवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने रद्द केली आहे. UGC-NET परीक्षेचा पेपरलीक झाल्याच्या संशयावरूनच NTA ने पेपर रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यात NEET परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा NET परीक्षेमध्ये देखील घोळ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे लाखो उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

मंगळवारी म्हणजेच 18 जून रोजी NTA ने देशातल्या विविध शहरांमध्ये नेट परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये पेन आणि पेपर या पारंपारिक पद्धतीने घेण्यात आले. या परीक्षेसाठी तब्बल 11,21,225 उमेदवार बसले होते. परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 12.30 अशी होती. तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी होती. 83 विषयांसाठी एकाचदिवशी NTA कडून ही परीक्षा घेण्यात आली. परंतु आता हीच परीक्षा रद्द झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 जून रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून काही इनपूट प्राप्त झाले होते. ज्यातून मंगळवारी झालेल्या UGC-NET परीक्षेत काही गडबड झाल्याचा संशय बळावत होता. त्यामुळे या परीक्षेची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येईल. याबाबतची माहिती स्वातंत्रपणे उमेदवारांना देण्यात येईल. तर दुसऱ्या बाजूला परीक्षेची चौकशी करण्यात येईल.