Ujjain Mahakal Temple Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आग; 14 जखमी (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात आज सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात आग (Ujjain Mahakal Temple Fire) लागली. या आगीत काही पुजारी आणि भाविक यांच्यासहित तब्बल १४ जणांना भाजले आहेत. आरतीदरम्यान गुलाल उधळल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या संपूर्ण घटनेने संपूर्ण मंदिर परिसरात मात्र मोठी खळबळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झालं. या आगीबाबत अधिक चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

कशी लागली आग – Ujjain Mahakal Temple Fire

खरं तर दररोजप्रमाणेच या सोमवारी सुद्धा पहाटे महाकाल मंदिरात भस्म आरती होत होती. पहाटे 5.45 च्या सुमारास आरतीच्या शेवटच्या क्षणी बाबांना गुलालाची उधळण करण्यात येत होती. यासोबतच पुजारीही एकमेकांवर गुलाल उधळत होते. दरम्यान, आरतीच्या ताटात जळणाऱ्या कापूरवर गुलाल पडल्याने तो विखुरला. यानंतर महाकालवर बांधलेल्या फ्लेक्सने पेट घेतला. यानंतर अचानक आग पसरली (Ujjain Mahakal Temple Fire) आणि पूजा करत असलेले संजय गुरू, दिलीप गुरु, कमल जोशी, विकास आणि मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा, चिंतामण गेहलोत यांच्यासह 14 जण जखमी झाले.

सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने बोललं जात आहे. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी म्हंटल की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत लोक किरकोळ भाजले. कोणीही गंभीर जखमी नाही. दरम्यान, याआधी सुमारे 30 वर्षांपूर्वी याच महाकाल मंदिरात चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी सुमारे 35 जणांचा मृत्यू झाला होता.