फलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर Rudi Koertzen यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण आफ्रिकेचे माजी अम्पायर रुडी कर्टझन (Rudi Koertzen) यांचे निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. रुडी कर्टझन (Rudi Koertzen) यांचा दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये एका रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते 73 वर्षाचे होते. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी ते गोल्फ खेळून परत येत होते. यादरम्यान या अपघातात त्यांच्याबरोबर असणाऱ्या बाकी दोन मित्रांचासुद्धा मृत्यू झाला आहे.

रुडी कर्टझन (Rudi Koertzen) यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल 209 वन डे, 108 कसोटी आणि 14 टी20 सामन्यात पंच म्हणून भूमिका बजावली होती. क्रिकेटच्या फिल्डवर फलंदाजाला अगदी स्लो मोशनमध्ये आऊट देणारे अंपायर अशी त्यांची संपूर्ण क्रिकेट विश्वात ओळख होती. फलंदाजाला बाद देताना ते एकदम हळुवारपणे आऊट देत होते.

वेस्ट इंडिजचे माजी पंच स्टीव्ह बकनर यांच्यानंतर शंभर कसोटी सामन्यात अम्पायरिंग करणारे आणि ते (Rudi Koertzen) दुसरे पंच ठरले होते. तसेच 200 वन डे सामन्यात अम्पायरिंग करण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. त्यांच्या या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर