हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार नेहमीच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत असते. यासाठी खास गरोदर महिलांसाठी सरकारने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरु केली. 2017 पासून या योजनेचा लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना सरकारकडून 6000 रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाते. पण हि योजना जरी गरोदर महिलांसाठी असली तरी यामध्ये काही अटीशर्ती देण्यात आल्या आहेत. तर आज आपण या योजनेचे उद्दिष्ट , अटी अन पैसे किती टप्प्यात दिले जातात , याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे उद्दिष्ट –
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर महिलांना स्वतःची अन बाळाची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक सहाय्य करणे . तसेच गरीब कुटुंबातील महिलांना हे पैसे त्यांच्या गरोदरपणाच्या काळात मदतीसाठी दिले जातात, ज्यामुळे त्यांना मानसिक आणि आर्थिक सपोर्ट मिळतो. पण या योजनेसाठी सरकारने काही अटीशर्ती लागू केल्या आहे त्या अशा कि , ——
महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 19 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणे गरजेचे आहे .
पात्र महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा सरकारी स्वास्थ्य केंद्रामध्ये जाऊन अर्ज करता येईल.
या योजनेचा लाभ फक्त सरकारी रुग्णालयातच मिळतो.
गर्भवती महिलांसाठी खास योजना –
या योजनेमुळे गरोदर महिलांना उपचारांची मदत मिळवता येते.
आई-बाळासाठी योग्य पोषण मिळवता येते .
योजनेच्या 6000 रुपयांचा लाभ तीन हप्त्यात –
पहिला हप्ता – 1000 रुपये, रजिस्ट्रेशन केल्यानंतर 150 दिवसांमध्ये मिळतात.
दुसरा हप्ता – 2000 रुपये, गरोदरपणाची तपासणी झाल्यानंतर 180 दिवसांमध्ये मिळतात.
तिसरा हप्ता – मुलाचा जन्म झाल्यानंतर आणि बाळाला सहा महिन्यांनी लस दिल्यानंतर दिला जातो.
योजना सुरू केल्यापासून अनेक महिलांसाठी याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना गरोदर महिलांसाठी एक महत्वाचे आर्थिक आधार ठरली आहे.