Underwater Hotel | पाण्याखाली असलेल्या या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी मोजावे लागतात इतके पैसे, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Underwater Hotel | जमिनीवर घरांमध्ये किंवा इमारती बांधून राहतो. उंच उंच बिल्डिंग असल्यामुळे आपल्याला एक वेळी हवेत राहण्याचा अनुभव येतो. परंतु पाण्याखाली राहण्याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का? हे सगळ्यांना शक्य होत नाही. परंतु आता जर पाण्याखाली राहण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर ते आता साकार होणार आहे. कारण टांझानियामध्ये एक असे अनोखे अंडरवॉटर हॉटेल तयार करण्यात आलेले आहे. आपण या हॉटेलच्या खिडकीतून मासे पाहू शकतो. त्याचप्रमाणे समुद्रातील सगळ्या गोष्टी पाहू शकतो. या ठिकाणी तुम्हाला राहता, खाता आणि झोपता देखील येणार आहे. परंतु या ठिकाणी राहण्यासाठी एका रात्रीची किंमत जाणून धक्का बसेल.

हाती आलेल्या माहितीनुसार टांझनियामधील झांसी (Underwater Hotel) बारमधील माता रिसॉर्ट आहे. जे पाण्याखाली आहे. येथील किनाऱ्याच्या आनंद लुटण्यासाठी अनेक लोक तिथे येत असतात. या रिसॉर्टमध्ये अनेक खोल्या देखील आहेत. या पाण्याखाली बांधलेल्या आहेत. यात एक बेडरूम आहे. त्याचप्रमाणे त्याच्या चारी बाजूंनी खिडक्या आहे. त्यातून तुम्हाला मासे ,कोरल यांसारख्या गोष्टी दिसतात.

या अंडरवॉटर (Underwater Hotel) रूममध्ये राहण्यासाठी तुम्हाला एका रात्रीसाठी 90 हजार रुपये मोजावे लागतात. या एका खोलीमध्ये दोन लोक राहू शकतात. रिसॉर्टमध्ये बुकिंग फक्त तीन दिवसांसाठी आहे. त्याचप्रमाणे पेम्बा बेटावर बांधलेला रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त 3700 रुपये द्यावे लागतात. हा पैसा आजूबाजूच्या स्वच्छतेसाठी त्याचप्रमाणे स्थानिक लोकांसाठी वापरला जातो.

ये रिसॉर्टमध्ये इतर खोल्या देखील आहेत. परंतु त्या पाण्याखाली नाही. पाण्याखाली या खोली असल्यामुळे खिडकीतून तुम्हाला 360 डिग्रीमध्ये सगळे दिसू शकते. तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता. हे रिसॉर्ट स्वीडिश इंजिनियरच्या मदतीने तयार करण्यात आलेले आहे. हे तीन रिसॉर्ट 3 मजली आहे. पाण्याच्या खाली असलेल्या खोल्यांमध्ये लाउंज आणि बाथरूम इत्यादींची सोय देखील करण्यात आली आहे.