Underwater Metro : मेट्रो पाण्याखालूनही सुसाट…! जाणून घ्या देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोबद्दलच्या 10 मोठ्या गोष्टी

Underwater Metro pm
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Underwater Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च) 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे मोदी यांनी देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोला हिरवी झेंडी दाखवली. चला जाणून घेऊया या देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोच्या (Underwater Metro) काही खास गोष्टी

मेट्रोला पंतप्रधानांनी दिला हिरवा सिग्नल

पंतप्रधानांनी आज कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे (Underwater Metro) उद्घाटन केले. यानंतर त्यांनी मेट्रोमध्ये बसून प्रवास केला. मेट्रोमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करताना पंतप्रधान मोदींनी मेट्रो कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार आणि डब्ल्यूबी एलओपी आणि भाजप आमदार सुवेंदू अधिकारी हे देखील पंतप्रधान मोदींसोबत ट्रेनमध्ये उपस्थित होते.

मेट्रो बोगदा कोलकात्याच्या हुगळी नदीखाली बांधला आहे. हा बोगदा 16.6 किलोमीटर लांब आहे. अंडरवॉटर मेट्रो (Underwater Metro) हुगळी नदीच्या तळापासून 32 किलोमीटर खाली धावेल. ही मेट्रो हावडा आणि कोलकाता शहराला जोडेल. मेट्रो बोगदा कोलकात्याच्या हुगळी नदीखाली बांधला आहे. हा बोगदा 16.6 किलोमीटर लांब आहे. अंडरवॉटर मेट्रो (Underwater Metro) हुगळी नदीच्या तळापासून 32 किलोमीटर खाली धावेल. ही मेट्रो हावडा आणि कोलकाता शहराला जोडेल.

अंडरवॉटर मेट्रोच्या काही खास गोष्टी (Underwater Metro)

  • मेट्रो ट्रेन हुगळी नदीचे ५२० मीटर अंतर अवघ्या ४५ सेकंदात पार करेल.
  • या मेट्रोमध्ये ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन सिस्टीम आहे, म्हणजेच मोटरमनने बटन दाबताच ट्रेन आपोआप पुढच्या स्टेशनवर जाईल.
  • कमाल वेग ताशी 80 किमी असेल.
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, ट्रेनमध्ये सुधारित ग्रॅब हँडल आणि डब्यांमध्ये (रेक) हँडल लूप तसेच अँटी-स्किड फ्लोअर्स आणि अग्निशामक उपकरणे देखील असतील.
  • आपत्कालीन परिस्थितीत, टॉक टू ड्रायव्हर युनिटद्वारे प्रवासी मोटरमनशी संवाद साधू शकतील.
  • प्रत्येक कोचवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही असतील. प्रत्येक कोचमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा असतील.
  • हावडा मैदानापासून एस्प्लानेडला जाण्यासाठी सहा मिनिटे लागतील.
  • एकूण 16 किमी मार्गापैकी 10.8 किमी भूमिगत आहे. यामध्ये नदीच्या खालच्या भागाचाही समावेश आहे.
  • पाण्याखालील मेट्रो गंगेची उपनदी हुगळीच्या पायथ्याशी १३ मीटर खाली जाईल. दोन्ही बोगदे समांतर बांधण्यात आले आहेत.
  • 2035 पर्यंत या मेट्रोतून (Underwater Metro) 10 लाख प्रवासी प्रवास करतील.