Union Bank Recruitment 2025 : Union बँकेत 500 जागांसाठी भरती; पहा पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

Union Bank Recruitment 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Union Bank Recruitment 2025 । बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) ( Assistant Manager – Credit) , सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) ( Assistant Manager – IT) ‘ हि पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी 20 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या जॉब साठी काय पात्रता आहे? अर्ज कुठे करावा आणि वेतन किती असेल याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात….

जाहिरातीनुसार ‘सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) , सहाय्यक व्यवस्थापक (आयटी)’ या पदासाठी हि भरती होणार आहे. एकूण 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यातील 250 जागा ‘सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) अंतर्गत भरल्या (Union Bank Recruitment 2025) जातील तर उरलेल्या 250 जागा ‘सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) अंतर्गत भरण्यात येतील

शैक्षणिक पात्रता: Union Bank Recruitment 2025

सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) साठी सदर उमेदवाराकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी तसेच CA/CMA(ICWA)/ किंवा 60% CS गुण MBA/MMS/PGDM/PGDBM असावे.

सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) साठी : बीई/बीटेक/एमसीए/एमएससी (आयटी)/एमएस/एमटेक (कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स/डेटा सायन्स/मशीन लर्निंग आणि एआय/सायबर सिक्युरिटी) तसेच ०१ वर्ष अनुभव असावा..

वयाची अट: ०१ एप्रिल २०२५ रोजी २२ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

वेतन- या पदासाठी दरमहा ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळेल.

अर्ज शुल्क
UR/ EWS/ OBC उमेदवारांसाठी – 1180/-रुपये

SC/ ST/ PwBD उमेदवारांसाठी – 177/- रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Union Bank Recruitment 2025)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 एप्रिल 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

महत्वाच्या लिंक्स (Union Bank Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.