महिलांसाठी मोठी घोषणा!! सरकार सुरू करणार बचत योजना; ‘इतके’ व्याज मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यावेळी मोदी सरकारडन मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी देशातील महिलांसाठी सुद्धा केंद्र सरकारने एक खास बचत योजना आणली आहे. महिला सम्मान बचत पत्र योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेअंतर्गत महिलांना २ लाखांच्या बचतीवर ७. ५ टक्के व्याज मिळणार आहे.

देशभरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आणि त्या इतर कोणावर अवलंबून न राहण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी आज महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना जाहीर केली आहे. या विशेष योजनेअंतर्गत आता महिला किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे. यामध्ये दोन वर्षांचा गुंतवणुकीचा पर्याय देण्यात आला आहे. या ठेवीवर कर सवलत मिळेल आणि तुम्हाला 7.5% व्याज सुद्धा दिले जाईल. महिलेच्या मृत्यूनंतर ही रक्कम तिच्या वारशाला दिली जाईल.

याशिवाय देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाखांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. मोदी सरकारे देशातील करदात्यांना सुद्धा मोठा दिलासा दिला आहे. सीतारामन यांनी नवी कररचना जाहीर केली आहे. त्यानुसार ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे करदाते त्यांच्या वाचणाऱ्या पैशातून गुंतवणुकीकडे वळतील आणि याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.