Union Budget 2024 : दर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत; मोदी सरकारची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणात त्यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडत देशातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. देशात सौरऊर्जेला चालना देणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. त्यानुसार, देशातील १ कोटी घराना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे अशी घोषणा त्यांनी केली.

वाढत्या वीजबिलामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलाच चाप बसत असतो. यावरच मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत सरकारच्या रूप टॉप सोलर योजनेंतर्गत देशातील १ कोटी घरांना दर महिन्याला ३०० युनिट मोफत वीज देण्यात येईल. यामुळे देशातील विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी मोठी मदत होईल.

5 वर्षात ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधणार –

निर्मला सीतारामन यांनी पुढे म्हंटल, पीएम आवास योजनेअंतर्गत 3.5 कोटींहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. याशिवाय आगामी 5 वर्षात केंद्र सरकार ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. सरकार घरांसाठी नवीन गृहनिर्माण योजना आणणार (Union Budget 2024) असून या योजनेत भाड्याची घरे, चाळी किंवा बेकायदा वसाहतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली.

हे पण वाचा – आता रेल्वे प्रवास होणार आरामदायी; सरकारने केली मोठी घोषणा

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणा – Union Budget 2024

पायाभूत सुविधांसाठी ११ लाख ११ हजार कोटींची तरतूद
वार्षिक ७ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही
प्रत्येक महिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहान देऊन जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणणार
देशात इ बस सेवाही राबवणार
४० हजार रेल्वे कोच वंदे भारत मध्ये बदलणार
१ कोटी घराना सौरऊर्जा देण्याचा प्रयत्न
३ रेल्वे कॉरिडोर सुरु केले जाणार
राज्यांच्या विकासासाठी बिनव्याजी ७५ हजार कोटी रुपये देणार
पर्यटनाचा विकास करण्यासाठी राज्यांना साहाय्य करणार
युवा उद्योजकांसाठी १ लाख कोटींचा फंड
देशात १५ नवे एम्स हॉस्पिटल सुरु करणार
मच्छिमारांसाठी ५५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे
नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल
पर्यटन केंद्राचा वेगाने विकास केला जाणार