Union Budget 2024: मोदी सरकार पुढील 5 वर्षात 2 कोटी घरे बांधणार; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज (शुक्रवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचे अंतरिम बजेट Union Budget 2024 सादर करत आहेत. हा मोदी सरकारच्या काळातील अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आले आहेत. यातील महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे, येत्या पाच वर्षात राज्यात 2 कोटी घरे बांधण्याची होय. नुकतीच निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये दोन कोटी घरे बांधले अशी घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बोलताना म्हटले आहे की, “सध्याच्या घडीला देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेला आहे. पारदर्शी शासन यावर आमच्या सरकारचे लक्ष्य आहे. येत्या 5 वर्षात मोदी सरकार ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधेल. तर प्रत्येक महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाईल” असे महत्त्वपूर्ण घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणा – Union Budget 2024

पायाभूत सुविधांसाठी ११ लाख ११ हजार कोटींची तरतूद
४० हजार रेल्वे कोच वंदे भारत मध्ये बदलणार
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहान देऊन जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणणार
देशात इ बस सेवाही राबवणार (Union Budget 2024)
१ कोटी घराना सौरऊर्जा देण्याचा प्रयत्न
देशात १५ नवे एम्स हॉस्पिटल सुरु करणार
३ रेल्वे कॉरिडोर सुरु केले जाणार
राज्यांच्या विकासासाठी बिनव्याजी ७५ हजार कोटी रुपये देणार
पर्यटनाचा विकास करण्यासाठी राज्यांना साहाय्य करणार
युवा उद्योजकांसाठी १ लाख कोटींचा फंड
मच्छिमारांसाठी ५५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार
वार्षिक ७ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही
प्रत्येक महिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे
नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल
पर्यटन केंद्राचा वेगाने विकास केला जाणार