Union Budget 2025 : बजेटपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उसळी; झटक्यात वाढला दर, प्रति 10 ग्रॅम …

0
1
gold hike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Union Budget 2025 : 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटपूर्वी (Union Budget 2025) सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सोने आपल्या सर्व जुन्या विक्रमांना मागे टाकत नवीन उच्चांक गाठत आहे. दरम्यान गुड रिटर्न्स या वेबसाईटवरून दिलेल्या सोन्याच्या किमतीनुसार आज (1) सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्राम साठी तब्बल 84 हजार 490 रुपयांवर पोहोचला आहे

देशांतर्गत बाजारात सोने महागले

22 कॅरेट – आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर 77,450 रुपये आहे हाच दर काल 77 हजार 300 रुपये इतका होता म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 150 रुपयांची वाढ झाली आहे. तर एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 7745 रुपये इतका आहे.

24 कॅरेट – शिवाय 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज दहा ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 84 हजार 490 रुपये इतका आहे. हा दर काल 8430 रुपये इतका होता. म्हणजेच आज 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 160 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. शिवाय एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 8449 रुपये आहे.

GST आणि मेकिंग चार्जनंतर किंमत वेगळी (Union Budget 2025)

IBJA वेबसाइटवर दिलेले दर संपूर्ण भारतात समान असतात. मात्र, हे दर GST आणि मेकिंग चार्जशिवाय असतात. 3% GST आणि वेगवेगळ्या शहरांतील मेकिंग चार्ज जोडल्यास ही किंमत आणखी वाढू शकते. 1 फेब्रुवारी रोजी काही शहरांमध्ये सोन्याचा दर 84,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत (Union Budget 2025) पोहचला आहे. त्यामुळे आत बजेटनंतर सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होईल का? कस्टम ड्युटीमध्ये बदल झाल्यास बाजारावर काय परिणाम होईल? सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ आहे का? असे अनेक प्रश्न ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये उपस्थित होत आहेत.