Satara News : कराडातील हजारमाचीचे भूकंप संशोधन केंद्र हे उत्तम दर्जाचे केंद्र : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड येथे भूकंपावर संशोधन करण्याबाबत जे हजारमाजी येथे एक मोठे संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे ते एक उत्तम अशा दर्जाचे केंद्र आहे. या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी भूकंप संशोधनाबाबत पुढे अधिक कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याविषयी चर्चा केली. कराड हे भारत देशातील सर्वात चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या भूकंप संशोधन केंद्रात भूकंपाबाबत चांगल्या प्रकारे संशोधन केले जात आहे. कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील एक चांगल्या पावसाचे ठिकाण असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी काढले.

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू हे दोन दिवशीय सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून काल गुरुवारी पहिल्या दिवशी त्यांनी महाबळेश्वर येथील हवामान विभागाच्या ढग संशोधन केंद्रास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आज सकाळी अकरा वाजता कराड तालुक्यातील हजारमाची येथील भूकंप संशोधन केंद्रास भेट दिली. तसेच येथील केंद्रातील सुरु असणाऱ्या कामाची माहिती घेतली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/655094176722848

यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देत पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड पालिकेचे माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये काम करत असताना आमच्याकडून जेवढी मदत ज्यामध्ये आर्थिक सहाय्य्यता किंवा संशोधनाच्या बाबतीत जी मदत लागेल तेवढी मदत करू. तसेच महाराष्ट्रातील राज्य सरकार देखील चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे केंद्रीयमंत्री रिजिजू यावेळी सांगितले.