Friday, January 27, 2023

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना सकाळी त्रास जाणवू लागला होता. दरम्यान त्यांची अचानक प्रकृती अचानक खालवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयातील खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले.

सध्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, 63 वर्षीय सीतारामन यांना आरोग्यासंबंधीची समस्या जाणवल्यानंतर त्यांच्या तब्बेतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे.

- Advertisement -

 

निर्मला सीतारामन् यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 2014 मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. 3 सप्टेंबर 2017 पासून ते 30 मे 2019 त्या भारताच्या संरक्षणमंत्री व 30 मे 2019 ते आतापर्यंत भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले. त्यापूर्वी सीतारामन् यांनी अर्थ राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.