Wednesday, October 5, 2022

Buy now

रामदास आठवलेंच्या मागण्या : आरपीआयला मंत्रीपद, 2-3 महामंडळे आणि मुंबई पालिकेत उपमहापाैर पद अन् बरचं काही

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रिपब्लिकन पार्टीला शिंदे- फडणवीस सरकारमध्ये एक मंत्रीपद, दोन-तीन महामंडळ, बाकी सर्व महामंडळात आमच्या पक्षाचे एक- दोन मेंबर पाहिजेत. जिल्हा तालुका पातळीवरती आमच्या पक्षाचे एक- दोन मेंबर प्रत्येक ठिकाणी पाहिजेत. महापालिकेची निवडणूक ही चॅलेंजिंग आहे. येथे आम्ही सोबत असल्याने आम्हांला उपमहापाैरपद पाहिजे, अशा अनेक बऱ्याच मागण्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या आहेत.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाला काय- काय, कुठे- कुठे पाहिजे अन् पक्षाची ताकद कशी आहे, हे सविस्तरपणे सांगितले. त्यासोबत विरोधकांसह मनसेवर हल्लाबोल केला. तर एकनाथ शिंदे गटाचे काैतुक केले. शिवसेना चिन्ह हे तर एकनाथ शिंदे गटाला मिळणार असून त्याचीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आरपीआय पक्षांची भूमिकाही मांडली.

रामदास आठवले म्हणाले, मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी मनसेची काही आवश्यकता नाही. मनसेच्या भूमिकेमुळे आपल्याला नुकसान होऊ शकते, कारण त्यांची भूमिका मराठी माणसाची आहे. मात्र, उत्तर भारतीय, परराज्यातील लोक त्यांच्यावरती नाराज आहेत. मागच्या निवडणुकीत भाजप आणि आरपीआय हे एकत्र असल्यामुळे 82 जागा जिंकल्या. आता तर एकनाथ शिंदे यांचा गट सोबत आहे. त्यामुळे मनसेची आवश्यकता अजिबात नाही. 1992 मध्ये आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी आरपीआयचे चंद्रकांत हांडोरे हे महापौर झाले होते. आता मुंबई महापालिकेत आरपीआयला उपमहापौर पद मिळावे. अशी आमची मागणी आहे. याबाबत आम्ही लवकरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेणार आहोत.