‘अन्यथा भाजपाकडे काम घेऊन येऊ नका’, चंद्रकांत पाटील यांचा खा.संजय मंडलिकांना दम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। ”आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा. अन्यथा भारतीय जनता पार्टीकडे काम घेऊन येऊ नका” असा सज्जड दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना दिला आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख मेळाव्यात ते बोलत होते.

दक्षिण मतदार संघात ‘आमंच ठरलंय’ची परतफेड म्हणून काँग्रेसला मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केल आहे. ”आम्हाला गद्दारी जमत नाही. म्हणूच रोष पत्करून आम्ही युतीधर्म पाळला. आता तुम्ही युती धर्म पाळा नाहीतर एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी खासदार मंडलिकांच्या निमित्ताने शिवसेनेलाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर कोल्हापूरात शिवसेना आणि भाजपाध्ये फाटलं का ? असा सवाल अनेकांना पडला आहे. आता शिवसेना पाटील यांच्या सज्जड दमाला किती गंभीररित्या घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र, पाटील यांनी कोल्हापुरात युतीत सर्व काही आलबेल ‘नाही’ आहे, या गोष्टीला आपल्या बोलण्यातून दुजोरा दिला आहे.

इतर काही बातम्या-