पुढील 2 दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; या भागात गारपीठ होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मिचांग चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आणखीन तीव्र झाली आहे. यामुळे 2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या चक्रीवादळामुळेच अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसेच महाराष्ट्रातील काही भागात गारपीट होईल. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

दरम्यान, पुढील 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि जळगाव या भागात देखील मेघगर्जना होऊ शकते. तसेच, 30 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.