हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एप्रिल महिना सुरू झालेला आहे. या कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली दिसत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या या गडबडीत शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होताना दिसत आहे. आता या नुकसानीचे पंचनामे कधी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाचे संकट अजूनही संपलेले नाही. तर 13 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान या तीन दिवसात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (Unseasonal Rain In Maharashtra) दिलेला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पाऊस पडणार आहे.
आयएमडीचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 13 एप्रिल रोजी मध्य भारतात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी वादळ वारा आणि गारपीटीचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. 14 एप्रिल रोजी मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र देखील मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विजा आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार आहे. त्यामुळे 15 एप्रिलपर्यंत अवकाळी (Unseasonal Rain In Maharashtra) पावसाचा अलर्ट कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागात हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस | Unseasonal Rain In Maharashtra
नागपूरमध्ये सलग तीन दिवस अवकाळी पाऊस झालेला आहे. आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे. अनेक ठिकाणी आज पहाटे विजांसह वादळी वारा झालेला आहे. या भागात मागील दोन दिवसांपासून ऑरेंज अलर्ट जारी केला होता. परंतु त्या तुलनेत पाऊस खूप जास्त पडलेला आहे. विदर्भात देखील पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे
वाशिममध्ये झाला जोरदार पाऊस
वाशिममधील शिरपूर या परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे. मागील तीन दिवसात या परिसरात पाऊस झालेला आहे. या अवकाळी पडलेल्या पावसामुळे तेथील सगळ्या नद्या आणि नाले पूर्णपणे ओसांडून वाहत आहेत. आणि शेतकऱ्यांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हळद उत्पादक शेतकऱ्याचे देखील खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यामुळे गावातील घरे आणि शाळांवरून पत्रे उडून गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागांचे देखील नुकसान झाले आहे.