Unseasonal Rains | होळी संपली की सर्वत्र उन्हाळ्याला प्रमाणात सुरुवात होते. परंतु या उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना राज्यात अवकाळी पावसाने चांगलीच झडप घातलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आलेला आहे. पंढरपूर, वाशीम, अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तसेच नाशिक या ठिकाणी अवकाळी पाऊस पाहायला मिळालेला आहे. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) आंबा बागांसह उन्हाळी अनेक पिकाचे नुकसान झालेले दिसत आहे.
सध्या वातावरणात उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या पावसाने उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा दिला आहे. परंतु अचानक अवकाळी आलेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. वाशिम जिल्ह्याचे तापमान मागील आठवड्यापासून 40°c पर्यंत पोहोचलेले होते. परंतु अचानक काल तिथे पाऊस पडला. यामुळे आंबा पिकांचे त्याचप्रमाणे उन्हाळी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
विदर्भात पावसाची शक्यता | Unseasonal Rains
हवामान खात्याने पावसाबाबत शक्यता वर्तवली आहे. याबाबत आज अकोला जिल्ह्यातील मर्जीपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्याचे तापमान मागील 2 दिवसांपासून 42 अंश एवढे आहे. त्यामुळे आता हवामान विभागाने पावसाचा इशारा देऊन शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलेला आहे.
नाशिकमध्ये रस्त्यावर पाणी
नाशिकमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यावरून देखील पाणी वाहू लागलेले आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे त्यातील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे आता शेतकरी देखील नुकसान भरपाईसाठी सरकारकडे भाव घेणार आहेत. हवामान खात्याने आधीच सांगितल्याप्रमाणे ज्या भागात पाऊस येणार आहे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.