चित्रा जी, संजय राठोड आठवतायत का? उर्फी जावेदने घेरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात टि्वटर वॉर पहायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्या अतरंगी स्टाइलमुळे चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला होता. असा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही असं म्हणत त्यांनी थेट उर्फीच्या थोबाडीत मारण्याची भाषा केली. यांनतर उर्फी जावेदने ट्विट करत चित्रा वाघ यांना जुन्या विषयाची आठवण करून दिली. चित्रा जी, संजय राठोड आठवतायत का? असा खोचक सवाल तिने केला आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी तुम्हाला माझी मैत्रीण करू इच्छिते. चित्राजी, तुम्हाला संजय आठवतात का?, तुम्ही भाजपमध्ये गेल्यावर ते तुमचे चांगले मित्र झाले, तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात ज्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये एवढी धुसफुस केली होती असं ट्विट करत उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करणाऱ्या या उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्या अशी मागणी चित्रा वाघयांनी केल्यांनतर तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेतील अडसर आहेत. असा पलटवार उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर केला होता. येव्हडच नव्हे तर ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही..? महिला शिक्षण, लाखो-लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे? तुम्ही का नाही करत..? असा उलट सवाल तिने चित्रा वाघ याना केला होता .