हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ 2025 (Mahakumbh 2025) साठी देश-विदेशातून तब्बल 40 कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. महत्वाचे म्हणजे, या भल्या मोठ्या उत्सवातून उत्तर प्रदेश सरकारला दोन ते चार लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा आकडा खूप मोठा असला तरी महाकुंभसाठी येणाऱ्या लोकांची संख्या देखील जास्त असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सांगितले जात आहे की, भाविकांनी एका व्यक्तीमागे पाच हजार रुपये खर्च केल्यास सरकारला दोन लाख कोटींवर महसूल मिळेल. तर सरासरी खर्च दहा हजारांवर गेल्यास हा आकडा चार लाख कोटींवर पोहोचू शकतो. याचा थेट फायदा उत्तर प्रदेश सरकारला होईल. तसेच सरकारच्या आर्थिक तीजोरीमध्ये भर होईल. दुसऱ्या बाजूला, या भव्य महाकुंभ मेळाव्यासाठी प्रशासनाने देखील भव्य तयारी केली आहे.
प्रशासनाकडून संगम किनाऱ्यावर 1,50,000 छावण्या उभ्या करण्यात आल्या आहेत. तर भाविकांच्या भोजनाची सोय करण्यासाठी 3,000 किचन्स, विश्रांतीसाठी 1,45,000 रेस्ट रूम्स, आणि वाहतुकीसाठी 99 पार्किंग लॉट तयार करण्यात आले आहेत. यासह सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडक ठेवण्यात आली आहे. कुंभ मेळाव्यात 40,000 पोलिस जवान तैनात करण्यात आले आहेत.
यासोबत, 2,700 एआय-नियंत्रित कॅमेरे आणि ड्रोनद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. एनएसजीच्या पाच विशेष तुकड्या, 7 हेलिकॉप्टर आणि जल पोलिसही सज्ज याकाळात सज्ज राहतील. दरम्यान, एनएसजी, यूपी एटीएस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि जल पोलिसांनी संयुक्त सराव करून सुरक्षा यंत्रणांची क्षमता ही तपासण्यात आली आहे. त्यामुळे महाकुंभ हा फक्त एक मेळावा नसून आर्थिक उलाढालीचा देखील मार्ग असल्याचे म्हणले जात आहे.