शिक्षिकेचा वर्गातच विद्यार्थ्याकडून मसाज करून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका सरकारी शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शाळेतील एका शिक्षिकेने चक्क विद्यार्थ्यांकडून मसाज करून घेतला आहे. याचा एक व्हिडिओ (Video Viral) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. या प्रकरणी त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. हरदोईमधील पोखरी प्राथमिक विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

उर्मिला सिंह असे या निलंबित झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या या शाळेत सहशिक्षिका म्हणून काम करतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओत (Video Viral) त्या एका खुर्चीत बसलेल्या दिसत आहेत. तर इतर मुलांसमोर एक विद्यार्थी त्या शिक्षिकेच्या हाताला मसाज करताना व्हिडिओत (Video Viral) दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral) जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणी या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातीलच दुसऱ्या एका शाळेत असाच एक संतापजनक प्रकार घडला आहे. यामध्ये अचानक त्या शाळेत इन्स्पेक्शन झालं. त्यावेळी इंग्रजीच्या शिक्षिकेला पुस्तकातील चार इंग्रजी ओळीही वाचता आल्या नाहीत. हा व्हिडिओदेखील (Video Viral) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!