Upcoming IPO | येत्या आठवडत्यात गुंतवणुकीसाठी खुले होणार 4 मोठे IPO, जाणून घ्या शेअर्सची किंमत

Upcoming IPO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Upcoming IPO | येता आठवड्यामध्ये चार कंपन्यांचे आयपीओ हे गुंतवणुकीसाठी खुले होणार आहे. खुले होणारे हे चारही आयपीओ एसएमई या विभागातील असणार आहेत. या IPO मध्ये स्लोन इन्फोसिस्टीम, स्टोरेज टेक्नॉलॉजी ऑटोमेशन, एम के प्रॉडक्ट्स, तसेच साई स्वामी मेटल्स अलॉयज इत्यादींचा समावेश असणार आहे. या दिलेल्या आयपीओंपैकी तीन आयपीओ (Upcoming IPO) हे एकाच दिवशी खुले होणार आहे. आता या ipo ची सविस्तर माहिती त्यांची प्राईज या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

स्टोरेज टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशन | Upcoming IPO

स्टोरेज टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशनचा आयपीओ हा 30 एप्रिल रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. त्याचप्रमाणे 3 मे रोजी हा बंद देखील होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या शेअर्सची लिस्ट 8 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत ही 73 ते 78 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच या कंपनीचे आयपीओ यांच्या माध्यमातून 29.95 कोटी रुपये उभारण्याच्या उद्दिष्ट आहे हे.

एम के प्रॉडक्ट्स

एम केप्रॉडक्ट्सचा आयपीओ हा 30 मे रोजी खुला होणार आहे. आणि 3 मे रोजी बंद देखील होणार आहे. त्याचप्रमाणे या शेअर्सची लिस्ट देखील 8 मे रोजी जाहीर होणार आहे. या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत 52 रुपये ते 55 रुपये दरम्यान असणार आहे कंपनीचे या ipo द्वारे 12.61 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे.

साई स्वामी मेटल्स अँड अलॉयज | Upcoming IPO

साई स्वामी मेटल्स अँड अलॉयज यांचा आयपीओ हा 30 एप्रिल रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. त्याचप्रमाणे 3 मे रोजी बंद देखील होणार आहे. या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत 60 रुपये असणार आहे. या ipo च्या माध्यमातून 15 कोटी रुपयांचे उद्दिष्ट कंपनीचे आहे.

स्लोन इन्फोसिस्टीम

स्लोन इन्फोसिस्टीमचा आयपीओ 3 मे रोजी खुला होणार आहे. त्याचप्रमाणे 7 मे रोजी तो बंद देखील होणार आहे. त्याचप्रमाणे या शेअर्सची लिस्टिंग 10 मे रोजी होणार आहे. याच्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत ही 79 रुपये एवढी असणार आहे. त्याचप्रमाणे हा आयपीओ 11. 6 कोटी रुपये उभारणार आहे.