UPI New Feature | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले होते. आणि ते स्वप्न आज स्वतः उतरताना आपण पाहत आहोत. आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती झालेली आहे. अगदी पैशांपासून ते सगळ्याच गोष्टी डिजिटल झालेला आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतातील जास्तीत जास्त व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होत आहेत. कॅशचा वापर खूप कमी प्रमाणात होतो. मोबाईलद्वारे देखील यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार केले जातात. अशातच आता या यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
ती म्हणजे आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय (UPI New Feature) पेमेंटचे संबंधित एक नवीन फीचर लॉन्च केलेले आहे. आज जर आपण पाहिले तर प्रत्येक माणूस हा डिजिटल पद्धतीने ऑनलाईन पेमेंट करत असतो. मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार करण्याची ही अत्यंत सोपी सुलभ आणि जलद होणारी प्रक्रिया आहे. आता तुमचा यूपीआयचा पेमेंट अनुभव अधिक सुलभ होणार आहे. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. म्हणजेच तुमच्या युपीआय आयडी द्वारे तुमचे कुटुंब आणि मित्र देखील पेमेंट करू शकतील.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI circle (UPI New Feature)नवीन फीचर लॉन्च केले आहे. जे लोक स्वतः त्यांचे खाते सांभाळत नाही. त्यांच्यासाठी हे विशेषता उपयुक्त आहे. या वैशिष्ट्येच्या मदतीने ते त्यांच्या खात्यात दुसऱ्या व्यक्तीला जोडण्यास सक्षम राहतील आणि त्यांच्या यूपीआय पेमेंट देखील करू शकतील.
यूपीआय (UPI New Feature) सर्कलमध्ये तुम्हाला दुसऱ्या एका युजरला तुमच्या यूपीआय पेमेंटची जोडण्याची सुविधा मिळते. यामध्ये जो पहिला यूजर आहे, त्याच्यासोबत तुम्ही दुसऱ्या एका व्यक्तीला देखील जोडू शकता. म्हणजेच त्या युजरला देखील तुमच्या युपीआयडी द्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये प्राथमिक युजरला आणखी एका दुसऱ्याला जोडण्याचा पर्याय मिळेल. आणि या दुय्यम युजरची संख्या पाच असेल. म्हणजे पाच लोक एका वेळी एकाच व्यक्तीच्या युपीआयडीद्वारे पेमेंट करू शकतील.
या सुविधेमध्ये जे दुसरे युजर्स असतील. त्यांच्यासाठी व्यवहार करण्याची मर्यादा असेल यामध्ये एका वेळी जास्तीत जास्त 5 हजार रुपयांचे व्यवहार हे दुसऱ्या वापरकर्त्याला करता येणार आहेत. तर एका महिन्यात जास्तीत जास्त 15 हजार रुपयांचा व्यवहार करता येत आहे. यूपीआय सर्कलच्या फीचरमध्ये दोन पर्याय देखील असणार आहे. यामध्ये पहिला पूर्ण प्रतिनिधी असेल आणि दुसरा प्रतिनिधी असेल.