UPSC New Update | यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्ज सुधारणा विंडो सुरू केलेली आहे. त्यामुळे आता उमेदवार त्यांचे अर्ज चुकले असतील तर ते दुरुस्त करू शकतात. यूपीएससी (UPSC New Update) अंतर्गत अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेली होती. या भरती अंतर्गत सरकारने 1056 रिक्त पदे भरलेली होती. त्यामुळे ते जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज देखील सादर केले होते.
वयोमर्यादा | UPSC New Update
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे सामान्य श्रेणीतील उमेदवाराचे वय हे 21 ते 32 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ओबीसी श्रेणीतील व्यक्तींचे वय 35 वर्ष आणि अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे वय हे 37 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्यासाठी व्यक्तीची पदवी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निवड प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी उमेदवारांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण गरजेचे आहे.
अर्ज करण्याची तारीख
या आजची प्रक्रिया 14 फेब्रुवारी रोजी चालू करण्यात आलेली आहे. उमेदवारांना 5 मार्च अंतिम मुदतीपूर्वी फॉर्म सबमिट करायचे आहे. परंतु 6 ते 12 मार्च या कालावधीत देखील ही सुधारणा विंडो सुरू असेल म्हणजे जर तुम्हाला तुमच्य अर्जामध्ये सुधारणा करायची असेल तर 6 ते 12 मार्चपर्यंत तुम्ही करू शकता.
अर्ज शुल्क
अनुसूचित जाती आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीमध्ये 100 रुपये भरावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे इतर श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये अर्ज जमा करावे लागणार आहेत.