UPSC Prelims | यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध देखील करण्यात आलेले आहे. आणि आता त्यानुसार पूर्व परीक्षा 25 मेला होणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे.
यूपीएससीने (UPSC Prelims) पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे आणि आता त्या वेळापत्रकानुसार सर्विस प्रीडियम परीक्षा 2025 आणि आयएफएफ म्हणजेच इंडियन फॉरेस्ट सर्विस 2025 च्या आयोजन 25 मे 2025 रोजी करण्यात आलेले आहे. या संदर्भातील अधिसूचना 22 जानेवारी 2025 ला जारी करण्यात आलेली होती. त्यानंतर 11 फेब्रुवारी मध्ये अर्ज करण्याचा कालावधी देखील दिलेला होता. आणि आता या परीक्षांच्या पूर्व परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेले आहे.
25 मे रोजी होणार पूर्व परीक्षा
आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 22 ऑगस्ट पासून मुख्य परीक्षा चालू होणार आहे. त्याचप्रमाणे 25 मे पासून पूर्व परीक्षा चालू होईल. नागरी सेवा मुख्य परीक्षा 22 ऑगस्टला असेल, तर वनसेवा मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबरला सुरू होणार आहे.
मुख्य परीक्षा 22 ऑगस्ट पासून | UPSC Prelims
अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2024 हा कालावधी आहे. या कालावधीत तुम्हाला अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे 9 फेब्रुवारी 2025 रोजी पूर्व परीक्षा होईल. तसेच 26 जूनला मुख्य परीक्षा होईल संयुक्त जीओ सायंटिस्ट पूर्व परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी इतर मुख्य परीक्षा 21 जून रोजी पार पडणार आहे. त्याचप्रमाणे संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा ही 20 जुलैला होणार आहे.
या सगळ्या परीक्षांचे वेळापत्रक यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन वेळापत्रक पाहून घ्या.
www. upsc.gov.in