UPSC Recruitment 2024 | UPSC अंतर्गत नर्सिंग ऑफिसरच्या इतक्या पदांसाठी भरती, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPSC Recruitment 2024 | जे विद्यार्थी सरकारी नोकरीची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आलेली आहे. ती म्हणजे आता यूपीएससीने नर्सिंग ऑफिसरच्या पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. ही भरती सुरू व्हायला वेळ आहे. परंतु त्या आधीच तुम्हाला परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याचप्रमाणे सगळ्या महत्त्वाच्या तारखा लक्षात राहाव्या यासाठी तुम्ही हा ही बातमी नक्की वाचा.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने कामगारांनी रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळासाठी रिक्त जागा काढलेल्या आहेत. या रिक्त जागा काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

रिक्त पदे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या भरती अंतर्गत तब्बल 1930 रिक्त पदे आहेत. आणि ही रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Recruitment 2024)या भरतीसाठी तुम्ही 7 मार्च 2024 पासून अर्ज करायला सुरुवात करू शकता त्याचप्रमाणे 27 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या 20 दिवसात तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी सगळ्यात आधी तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर तुमच्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी होईल. वैद्यकीय तपासणी केली जाईल या सगळ्याची तपासणी झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

दरमहा वेतन | UPSC Recruitment 2024

वेतन स्तर 7 नुसार निवड झालेल्या उमेदवाराला पगार मिळेल. हा पगार दरमहा 42 हजार ते 63 हजार या दरम्यान असेल.

अर्ज करण्यासाठी शुल्क

अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी, डब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये शुल्क असणार आहे. त्याचप्रमाणे sc, St तसेच महिला उमेदवारांना फीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे.