UPSC Recruitment 2024 | UPSC अंतर्गत मोठी भरती सुरु, तब्बल 2535 रिक्त पदांची होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPSC Recruitment 2024 | सरकारी नोकरी करण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. आता अशीसरकारी नोकरीची एक संधी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे आता यूपीएससीकडून भरती प्रक्रियेबद्दल अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वेळ वाया न घालवता या पदासाठी अर्ज करा. यासाठी तब्बल 2535 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे. आणि या अंतर्गत विविध पदे देखील भरली जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

यूपीएससीच्या या भरतीमध्ये तब्बल 2535 पदांची भरती होणार आहे.

पदाचे नाव

यूपीएससीच्या (UPSC Recruitment 2024) या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, ऍलोपॅथी प्रादेशिक, दारूबंदी अधिकारी, सामाजिक विकास अधिकारी, विभागीय प्रकाशन अधिकारी आणि प्रादेशिक पर्यटन अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत

महत्वाच्या तारखा | UPSC Recruitment 2024

15 मार्च 2024 पासून ही यूपीएससीची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 12 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही अर्ज प्रक्रिया तुम्हाला केवळ ऑनलाइन पद्धतीनेच पूर्ण करता येईल.

वयोमर्यादा

यूपीएससीच्या या भरतीसाठी ज्यांचे वय 21 ते 40 दरम्यान आहे तेच उमेदवार फक्त या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही वयोगटातील लोक या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा