UPSC Recruitment 2024 | सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीमध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने स्पेशालिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, उप अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ आणि नागरी हायड्रोग्राफिक पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
UPSC च्या (UPSC Recruitment 2024) या भरती मोहिमेद्वारे एकूण 300 रिक्त जागा भरल्या जातील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 13 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या तारखेअगोदरच अर्ज करा.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
- स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (फॉरेन्सिक मेडिसिन) – 6 पदे
- असिस्टंट प्रोफेसर (यूरोलॉजी) – 1 जागा
- स्पेशलिस्ट ग्रेड III (मानसोपचार) – 1 पोस्ट
- स्पेशलिस्ट ग्रेड III (अनेस्थेसियोलॉजी) – 2 पदे
- स्पेशलिस्ट ग्रेड III (मानसोपचार) – 1 पोस्ट
- स्पेशालिस्ट ग्रेड III (पॅथॉलॉजी) – 4 पदे
- स्पेशालिस्ट ग्रेड III (सामान्य शस्त्रक्रिया) – 39 पदे
- स्पेशालिस्ट ग्रेड III (बाल नेफ्रोलॉजी) – ३ पदे
- स्पेशालिस्ट ग्रेड III (नेत्ररोग) – 3 पदे
- स्पेशालिस्ट ग्रेड III (त्वचाविज्ञान, वेनेरोलॉजी, कुष्ठरोग) – 2 पदे
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
सहाय्यक संचालक (हॉर्टिकल्चर) – 4 पदे
इंटेलिजन्स ब्युरो
उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी (तांत्रिक) (DCIO/Tech) – 9 पदे
एकात्मिक मुख्यालय (नौदल), नागरी कार्मिक संचालनालय
सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर – 4 पदे
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
प्रशिक्षण अधिकारी (महिला प्रशिक्षण) ड्रेस मेकिंग – 5 पदे
प्रशिक्षण अधिकारी (महिला प्रशिक्षण) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 3 पदे
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
सहाय्यक संचालक ग्रेड-II (IEDS) (अन्न) – 19 पदे
पुरातत्व सर्वेक्षण विभाग
उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ –4 पदे
उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ – 67 पदे
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
सहाय्यक संचालक ग्रेड-II (IEDS) (लेदर आणि शू) – 8 पदे
सहाय्यक संचालक ग्रेड-II (IEDS) (मेटल रिफायनिंग) – 2 पदे
अर्ज कसा करावा ?
- सर्व प्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- पहिल्या पेजवर उपलब्ध हायलाइट केलेल्या लिंक टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन लॉगिन वर क्लिक करा.
- नंतर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- तसेच अर्ज फी भरा.