Upvas Special Sabudana Batata Papad | प्रेशर कुकरमध्ये झटपट बनवा साबुदाणा – बटाट्याचे पळी पापड, होतील एकदम कुरकुरीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे. या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात घरांमध्ये वाळणीचे पदार्थ तयार करतात. या काळात पापड, कुरडई, खारवडी लोणचे, पळी पापडी यांसारखे पदार्थ तयार केले जातात. त्याचप्रमाणे उपवासाचे देखील साबुदाणा पापड, बटाटा चिप्स, साबुदाणा बटाट्याच्या चकल्या यांसारखे पदार्थ तयार केले जातात. जे आपण वर्षभर आपल्याला पाहिजे तसे तळून खाऊ शकतो.

अनेकवेळा आपण साबुदाणा बटाट्याचे (Upvas Special Sabudana Batata Papad) पळी पापड करतो. तेव्हा ते नीट होत नाही किंवा तेलात तळताच फुलत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला पळी पापड करण्याची एक सोपी आणि साधी ट्रिक सांगणार आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला जर झटपट पळी पापड करायचे असेल. तर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये हे पापडाचे मिश्रण तयार करू शकता. आणि काही मिनिटातच साबुदाणा बटाट्याचे पळी पापड तयार होतील. त्याचप्रमाणे तेलात टाकल्यावर ते चांगल्या प्रकारे फुलतील आणि कुरकुरीतही लागतील.

साबुदाणा बटाटा पळी पापडासाठी लागणारे साहित्य

  • 2 कप साबुदाणा
  • अर्धा किलो बटाटे
  • जिरे
  • मीठ
  • चिली फ्लेक्स

कृती | Upvas Special Sabudana Batata Papad

सगळ्यात आधी तुम्हाला एका भांड्यात दोन कप साबुदाणे घ्यायचे आहे. त्यात पाणी घालून साबुदाणा स्वच्छ धुऊन घ्या. आणि नंतर त्यात पाणी घालून रात्रभर साबुदाणे भिजत ठेवा. सकाळी तो साबुदाणा नीट भिजला आहे की नाही हे चेक करा. त्यात अर्धा किलो बटाटे घ्या. बटाट्याचे साल काढून किसणीने बटाटे किसून घ्या. पाणी घालून ते बटाटे स्वच्छ घेऊन घ्या.

त्यानंतर एक प्रेशर कुकर घ्या. त्यात तुम्ही सात ते आठ कप पाणी घाला. आणि भिजलेले साबुदाणा आणि बटाट्याचा कीस घालून मिक्स करा. झाकण लावून बंद करा व गॅसवर ठेवा. त्यानंतर प्रेशर कुकरच्या दोन शिट्या होऊ द्या. दोन शिट्यामध्येच हे मिश्रण तयार होईल. कुकर थंड झाल्यावर मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. आणि त्यात एक चमचा जिरं चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स घालून मिक्स करा. प्लॅस्टिक पेपरवर पळीने थोडे थोडे मिश्रण ओतून ते पसरवा. आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवा अशाप्रकारे तुमचे एकदम कुरकुरीत पापड तयार होतील.