हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Urban Company IPO 2025- होम सर्व्हिस प्रोव्हायडर अर्बन कंपनी लवकरच आपला आयपीओ (IPO) बाजारात दाखल करणार आहे. कंपनी मार्च 2025 पर्यंत 3000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट सादर करणार आहे. या प्रक्रियेसाठी कंपनीनं कोटक महिंद्रा कॅपिटल, गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनली यांची नियुक्ती केली आहे. या आयपीओमध्ये (Urban Company IPO 2025) नवीन आणि विद्यमान शेअर्स जारी केले जाणार आहेत. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मोठ्या प्रमाणात गुंतवणूक –
अर्बन कंपनीला (Urban Company IPO 2025) 2021च्या फंडिंग राऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळाली होती. जून 2021 मध्ये, प्रोसस, ड्रॅगनएअर आणि वेलिंग्टन मॅनेजमेंट यांच्या नेतृत्वात 255 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2.1 अब्ज डॉलर होतं. कंपनीचं भारतातील 30 हून अधिक शहरांमध्ये होम सर्व्हिस आणि ब्युटी सलॉन क्षेत्रात काम सुरू आहे. याशिवाय सिंगापूर, सौदी अरेबिया यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारांमध्येही कंपनीचं नेटवर्क आहे.
अर्बन कंपनीचा दावा (Urban Company IPO 2025) –
अर्बन कंपनी 57 हजारांहून अधिक भागीदारांसोबत काम करत असल्याचा दावा करते. कंपनी आपल्या सेवांसाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सोयीच्या वेळेत सेवा पुरवते.
रतन टाटा गुंतवणूकदार –
अर्बन कंपनीच्या (Urban Company IPO 2025) वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत रतन टाटा हे देखील या कंपनीचे गुंतवणूकदार होते. याशिवाय, टायगर ग्लोबल, थिंक इन्व्हेस्टमेंट, एसीसीईएल पार्टनर, व्हीवाय कॅपिटल आणि एलिव्हेशन या आघाडीच्या गुंतवणूकदारांनीही कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अर्बन कंपनीचा आयपीओ हा भारतीय स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधीचे दार उघडेल. कंपनीच्या वाढत्या ग्राहकवर्गामुळे होम सर्व्हिस क्षेत्रात मोठी मागणी आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि शेअर बाजारातील भागधारकांना या आयपीओकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
हे पण वाचा : SBI ची ‘हर घर लखपती’ योजना; कमी बचतीतून उभी करा मोठी रक्कम