म्हणून अमेरिकेने पाकिस्तान सोबतचे संबंध तोडले..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन | पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांसोबत असलेल्या संबंधामुळे आता पाकिस्तानला त्याची चांगलीच किंमत मोजावी लागणार आहे. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचा विडा उचललेल्या अमेरिकेने पाकिस्तानला मदतीच्या रूपाने देण्यात येणारे २१०० कोटी डॉलर रोखले आहेत. एवढी मोठी मदत रोखण्यामागे पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध आम्हाला खटकत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव कोण्ही फोकनर यांनी माध्यमांशी संवाद साधून याबद्दलची स्पष्टोक्ती दिली आहे.
या अगोदर ही अमेरिकेने ३३ कोटी डॉलरची मदत पाकिस्तानला दिली होती तसेच दहशदवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आल्याने ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदत रोखून धरली होती. अमेरिकेने ही मदत रोखल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.

Leave a Comment