मतदान कार्ड नसेल तर हे 12 ओळखपत्र दाखवून करा मतदान; वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा निवडणुक आता अगदी एका दिवसावर येऊन पोहोचलेली आहे. उद्या म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये विधानसभा निवडणूकसाठी मतदान होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रशासकीय यंत्रणा मतदानाच्या तयारीमध्ये आहे. तर मतदाराचा कोणाला मत द्यायचे याकडे लक्ष देत आहे. मतदान करायला जाताना आपले ओळखपत्र घेऊन जाणे खूप गरजेचे असते. परंतु जर तुमच्याकडे ओळखपत्र आले नसेल तर असे काही महत्त्वाचे ओळखीचे पुरावे आहे. जे घेऊन गेल्यानंतर देखील तुम्हाला मतदान करता येईल.

12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य

अनेक लोकांनी ची मतदार म्हणून नोंद आहे. परंतु त्यांच्याकडे मतदानाची ओळख पत्र नाही. परंतु अशावेळी निवडणूक आयोगाने तुमच्यासाठी अन्य 12 पुरावे मतदान म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे सांगितलेले आहे. त्यापैकी तुम्ही एखादा पुरावा घेऊन मतदार केंद्रावर गेला, तरी देखील तुम्हाला मतदान करता येणार आहे.

हे ग्राह्य धरले जाणारे 12 पुरावे कोणते?

  • तुम्ही जर मतदान केंद्रावर आधार कार्ड घेऊन गेले तरी देखील तुम्हाला मतदान करता येणार आहेत.
  • मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार देखील त्यांचे जॉब कार्ड दाखवून मतदान करू शकतात.
  • बँक किंवा टपाल खात्याचे पासबुक दाखवून देखील तुम्ही मतदान करू शकता.
  • श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्डचा वापर करून देखील तुम्ही मतदान करू शकता.
  • तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन दाखवून देखील मतदान करू शकता.
  • तुमच्या पॅन कार्ड चा वापर करून देखील तुम्ही मतदान करू शकता.
  • तुम्ही राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक आरजीसी यांनी दिलेले स्मार्ट कार्ड दाखवून देखील मतदान करू शकता.
  • तुमचा पासपोर्ट दाखवून देखील तुम्हाला मतदान करता येते.
  • तुमच्या वेतनविषयक कागदपत्रे दाखवून देखील मतदान करता येते.
  • केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र.
  • संसद विग्रहण सभा सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र दाखवून देखील मतदान करता येते.
  • भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र.