CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मित्रांनो, सिबिल स्कोअर (Cibil score) हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची माहिती दर्शवतो. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान मोजला जातो. जेव्हा तुम्ही घरासाठी, गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज घेता किंवा पर्सनल Loan घेण्याचा विचार करत असता तेव्हा बँकेकडून तुमचा सिबिल स्कोर (Sibil Score) चेक केला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर याचा अर्थ असा मानला जातो कि आत्तापर्यंत तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड अगदी वेळेत करत आहात. त्यामुळे समाजात तुमची किंमतही वाढते आणि तुम्हाला कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे सिबिल स्कोर चांगला ठेवणं गरजेच असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यासाठी मदतच होणार आहे.

यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमची बिले वेळेवर भरा. तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला आहे कि खराब आहे हे आधीच्या तुमच्या सर्व पेमेंटवरून समजत. जर तुम्ही तुमचे आधीच्या कर्जाचे पेमेंट थकवले तर त्याचा तुमच्या सिबिल स्कोरवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला राखण्यासाठी तुमची बिले, कर्जे आणि क्रेडिट कार्डची रक्कम वेळेवर भरणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणतीही चूक करू नका.

दुसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट अर्ज (Credit Application) मर्यादित करा. एकाच वेळी अनेक कर्जासाठी अर्ज करू नका. अशामुळे प्रत्येक ठिकाणी तुमच्या क्रेडिटची चौकशी आणि पडताळणी केली जाते. त्यामुळे तुम्ही कर्जासाठी भुकेलेले आहात असं दिसत आणि याचा तुमच्या सिबिल स्कोरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच क्रेडिटसाठी अर्ज करा.

तिसरी गोष्ट म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन (Credit Utilization) रेशो कमी ठेवा. क्रेडिट युटिलायझेशन म्हणजे तुम्ही सध्या वापरत असलेल्या क्रेडिटच्या लिमिटची टक्केवारी होय. जर तुम्ही क्रेडिटचा जास्त वापर केला तर तुमच्या सिबिल स्कोरवर याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो म्हणून क्रेडिटचा वापर क्रेडिट लिमिटच्या जास्तीत जास्त ३० % पर्यंत करा. म्हणजे उदाहरणार्थ जर तुमचे क्रेडिट लिमिट रु. १ लाख रुपयांपर्यंत असेल तर शक्यतो 30,000 पेक्षा जास्त वापर करू नका.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट रिपोर्ट (Credit Report) नेहमी डोळ्याखालून घाला आणि त्यामध्ये काही चुका आहेत का हे पहा. CIBIL कडून वर्षातून एकदा तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट मिळू शकतो तो व्यवस्थित चेक करा. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर तुम्ही थेट CIBIL शी बोलून त्या दुरुस्त करून घेऊ शकता.