मुंबई-काजीपेट दरम्यान चालवली जाणार ‘उत्सव विशेष ट्रेन’; जाणून घ्या वेळापत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतामध्ये सण आणि उत्सवांना अधिक महत्व आहे. मोठ्या उत्साहात भारतभरात सण साजरे केले जातात. सणासुदीच्या काळात अनेकजण आपल्या प्रियजनांच्या भेटी घेत असतात. नोकरीनिमित्त बाहेरगावी राहिलेले लोक आवर्जून आपल्या गावाकडे येतात. या काळात रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे अनेक प्रवासी आधीच रिजर्वेशन करतात. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता यंदा रेल्वेकडून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. आजच्या लेखात आपण याच संदर्भात माहिती घेणार आहोत.

मुंबईहून काजीपेटला जाण्यासाठी रेल्वेने खास सोय केली आहे. याच बाबतची माहिती आज या लेखात घेणार आहोत. मुंबई-काजीपेट दरम्यान विविध स्थानकांवर ही गाडी थांबे घेणार असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी कृपया https://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकता. किंवा NTES ॲप डाउनलोड करून या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेऊ शकता.

कसे असेल वेळापत्रक ?

07196 / 07195 दादर – काजीपेट साप्ताहिक विशेष (१० सेवा)

07196 साप्ताहिक विशेष गाडी दि. १७.१०.२०२४ ते २८.११.२०२४ पर्यंत दर गुरुवारी दादर येथून १५.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता काजीपेट येथे पोहोचेल. (५ सेवा) तर 07195 साप्ताहिक विशेष गाडी दि. १६.१०.२०२४ ते २७.११.२०२४ पर्यंत दर बुधवारी काजीपेट येथून १७.०५ वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. (५ सेवा)

थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद, आर्रमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिंगमपेट जगित्याल.

07198 / 07197 दादर -काजीपेट साप्ताहिक विशेष – बल्लारशाह मार्गे (१६ सेवा)

07198 साप्ताहिक विशेष दि. १३.१०.२०२४ ते ०१.१२.२०२४ पर्यंत दर रविवारी दादर येथून १५.२५ वाजता सुटेल आणि काजीपेट येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल. (८ सेवा) तर 07197 साप्ताहिक विशेष गाडी दि. १२.१०.२०२४ ते ३०.११.२०२४ पर्यंत दर शनिवारी काजीपेट येथून ११.३० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. (८ सेवा)

थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, नगरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, लिंगटी, कायर, वणी, भांदक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिर्याल, पेड्डापल्ली आणि जम्मीकुंटा.

कशी असेल ट्रेन संरचना

या दोन्ही विशेष गाड्यांच्या संरचनेबद्दल सांगायचे झाल्यास या गाडीला २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह २ गार्ड्स ब्रेक व्हॅन. उपलब्ध असेल.

कसे कराल आरक्षण

उत्सव विशेष ट्रेन क्रमांक 07196 आणि 07198 सेवांचे बुकिंग विशेष शुल्कासह आरक्षण ०८.१०.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच https://www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.