Uttarkashi Cloudburst : उत्तरकाशीत ढगफुटी!! गंगेचं रौद्ररूप, घरे उध्वस्त; Video पाहून अंग कापेल

Uttarkashi Cloudburst
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uttarkashi Cloudburst । उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली. धाराली भागात ढगफुटीची घटना घडली. यामुळे खिरगंगा नदीला मोठा महापूर आला. या पुरात अनेक घरे वाहून गेली.. उध्वस्त झाली.. याबाबतचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. नदीने रौद्ररूप पाहून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १२ कामगार गाडले गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

60 जण बेपत्ता असल्याचा दावा – Uttarkashi Cloudburst

धराली गावाला लागून असलेल्या नदीतून पाण्याचा प्रचंड लोंढा मातीच्या मलब्यासह गावात घुसला. बघता बघता सगळं वाहून गेलं .. अवघ्या २० ते ३० सेकंदात होत्याच नव्हतं झालं आणि लोकांची घरे अक्षरशः वाहून गेली… या महापुरात 60 जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे तर 12 लोक मलब्या खाली गाडल्या गेल्याची भीती आहे. तरलोकांच्या किंचाळ्या आणि वेदना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने या नैसर्गिक संकटाची पुष्टी केली आहे. तातडीने याठिकाणी मदत आणि पुनर्वसनची टीम दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. पुरामुळे धाराली बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. आजूबाजूला फक्त कचरा दिसत आहे. लोक आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. खीर गंगेच्या काठावर असलेले प्राचीन कल्प केदार मंदिरही ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे वृत्त आहे.

या महापुराच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, उत्तराखंडमधील धाराली भागात ढगफुटीची घटना (Uttarkashi Cloudburst) घडली आहे, जिथे पाण्याची पातळी वाढल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांच्या पथके बचाव आणि मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहेत. आम्ही लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. बाधितांना सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.