जिल्ह्यातील 1 लाख 16 हजार 499 पशुधनाचे लसीकरण पूर्ण : डॉ. अंकुश परिहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्याकडे 1 लाख 31 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून यांमधुन आजअखेर बाधित क्षेत्रातील गावांमध्ये 1 लाख 4 हजार 550 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये 11 हजार 949 असे एकूण 1 लाख 16 हजार 499 पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा व जावली असे 9 तालुक्यातील 65 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 391 व 48 बैल असे एकूण 439 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज दिनांक 21 सप्टेंबर 22 रोजी जिल्हयामध्ये 7 जनावरांचा मृत्यु झाला असून आज अखेर 71 गाई व 6 बैल असे एकूण 77 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत.

लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील एकूण 398 गावातील 1 लाख 34 हजार 735 पशुधनास लसीकरण करण्यात येत आहे.

लंम्पी चर्म रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.

आज जिल्हयास नव्याने पुणे येथुन पशुसंवर्धन विभागाकडून 1 लाख 50 हजार इतक्या लसीच्या मात्रा प्राप्त होत असुन याचा उपयोग जिल्हयामधील अबाधित क्षेत्रातील गावाचे पशुधनास तात्काळ प्रतिबधात्मक लसीकरण होण्यासाठी उपयोगात आणण्यात येत आहे.