औरंगाबाद : केंद्र शासनाने घोषणा केल्यानुसार 22 जूनपासून 18 पेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस देण्यास सुरुवात केली आहे. शहरात सकाळी 10 वाज्यापासून या सुरुवात झाली आहे . सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे लासिकरण चालणार आहे. या वेळेत 69 ठिकाणी लस देण्याची व्यवस्था मनपा आरोग्याने केली आहे. टोकन पद्धतीचा वापर करून लस देण्यात येत आहे. आजपासून शहरात किमान 100 केंद्र सुरू करणार असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली होती.
लस घेण्यासाठी आता नागरिकांना कोविन अॅपवर नोंदणी करण्याची गरज नाही. लसींचा मुबलक साठा मनपाकडे असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितले की, 69 केंद्रांवर लसीकरणाची सोय केली जाणार आहे.
प्रत्येक केंद्रांवर 200 लसी दिल्या जाणार आहेत. नागरिकांनी जास्त गर्दी करू नये यासाठी टोकन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. महापालिकाकडे कोव्हिशिल्ड लसींचा 59 हजारांचा साठा आहे, तर कोव्हॅकिक्सन लसींचा 1 हजारांचा साठा आहे. आता थेट केंद्रावरच नोंदणी केली जाणार आहे.