औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आरोग्य केंद्रात महापालिकेने लसीकरण सुरू केले असून त्या ठिकाणी येत्या सोमवारपासून प्राध्यापक कर्मचाऱ्यांची लसीकरण करण्यात येणार आहे.
विद्यापीठात कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार, आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्याची सूचना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली होती. विद्यापीठ परिसरातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी सुरक्षारक्षक आदी 45 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या कर्मचार्यांसाठी विद्यापीठातील आरोग्य केंद्रात येत्या सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. दररोज शंभर कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. प्लस घेऊ इच्छिणाऱ्यांना 12 जून पर्यंत आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
त्यासाठी विद्यापीठाची ओळख पत्र आधार कार्ड लसीकरणाच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर दिलेल्या तारखेला आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जाणार आहे, असे आवाहन कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद सोमवंशी यांनी केले आहे. दरम्यान, कर्मचारी संघटनेची मागणी मान्य झाल्या बद्दल राज्य उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पाथ्रीकर व पर्वत कासुरे यांनी विद्यापीठ व मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.