पाचगणीच्या सेंट झवेरीस काॅलेजमध्ये वाधवानसह तेवीस जणांचे संस्थात्मक विलगीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी प्रतिनिधी | खंडाळ्याहुन महाबळेश्वरला विषेश प्रधान सचिव गृह अमिताभ गुप्ता यांच्या पत्रावरुन प्रवास करुन महाबळेश्वर येथे आलेल्या वाधवान कुटुंबाला पाचगणीच्या सेट झवेरीस हायस्कूल व काॅलेजच्या होस्टेलमध्ये कडेकोट बदोबस्तात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असुन गुन्हे अन्वेषण, शिघ्र कृती दल याच्यासह स्थानिक पोलीस ठाणेचे जवान तैनात करण्यात आले आहे. वाधवान कुटुंबासह तेवीस जणांना कामलेजच्या होस्टल इमारतीमध्ये ठेवण्यात आले असुन होस्टेल इमारतीला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.

पाचगणीच्या सेट झवेरीस काॅलेजच्या होस्टेल इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या वाधवान कुटुंबासह तेवीस जणानवर कडेकोट बंदेबस्तासह. आरोग्य विभागाकडुन त्या २३ जणांची वैद्यकीय तपासनी झाली असुन त्यांना कोणतेही कोरोनाचे लक्षणे नाहीत अशी माहीती जिल्हाअधिकारी सातारा यांनी दिली आहे. मात्र वाधवान कुटुंबाना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या सेट झवेरीस काॅलेजच्या होस्टेलॅध्ये स्थानिक नगरपालिकेचे मुख्याअधिकारी ,महाबळेश्वर तहसिलदार यांची दिवसातून भेट होत आहे.

पाचगणी येथील सेंट झवेरीस काॅलेजच्या इमारतीमध्ये कडेकोट बंदोबस्त पोलीसानकडुन ठेवण्यात आला असुन इतर कोनालाही वाधवान कुटुबाच्या २३ जणांना भेटले दिले जात नाही. आरोग्य विभागाकडुन २३ जणाच्या हातावर शिक्के मारुन त्यांनी होस्टेलच्या इमारतीमध्ये संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबासह २३ जणांची जेवनाची सोस काॅलेजच्या कॅन्टीनमधुन केली गेली असल्याची माहीती समोर आली आहे.

Leave a Comment