Vaibhavi Deshmukh HSC Result। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (Maharashtra HSC Results 2023 Declared) इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर केला आहे. बोर्डाने आज पत्रकार परीषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने सुद्धा वडिलांच्या निधनानंतर अतिशय कठीण परिस्थितीत १२ विची परीक्षा दिली होती. सर्वांसोबत आज वैभवीचा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे. अभिमानाची बाब म्हणजे वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. एकीकडे आपल्या वडिलांची झालेली निर्घृण हत्या, त्यानंतर न्यायासाठी करत असलेला संघर्ष या सर्वांवर मात करत वैभवी देशमुखने १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे…
वैभवीला कोणत्या विषयात किती गुण मिळाले- Vaibhavi Deshmukh HSC Result
वैभवी देशमुखला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत. तिची एकूण टक्केवारी 85.33 आहे. आज निकालाच्या (Vaibhavi Deshmukh HSC Result) दिवशी सकासकाळीच वैभवीने वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला येईल असा विश्वास सुद्धा वैभवीने व्यक्त केला होता. अखेर तिचा निकाल जाहीर झाला.. सर्वानी कौतुकाची थाप पाठीवर मारावी असे गुण वैभवी देशमुखने मिळवले आहेत.
खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लेक कशी असावी याच उदाहरण वैभवीने दाखवून दिले…. देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या आंदोलनात, न्याय मागणीच्या लढ्यात वैभवी अग्रेसर होती . आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी वैभवीने आक्रोश केला. मोर्चा काढले, उपोषण केलं, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वैभवीच्या धैर्याकडे गेल… वडिलांच्या न्यायासाठी वैभवीने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती, काका धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाला साथ दिली… भगवान गडाचे महंत नामदेव शात्री महाराज यांचीही भेट घेतली… लढवय्या बापाची लढवय्यी लेक म्हणून वैभवीकडे बघितलं जाऊ लागलं… एकीकडे वडिलांच्या निधनानंतरचा मानसिक आघात पचवतानाच वैभवीने १२ विच्या परीक्षेचाही अभ्यास केला होता. संपूर्ण घर संकटात असतानाही वैभवीने हार मानली नाही. अनेकदा पोलिस चौकशी, आजूबाजू निर्माण झालेली कष्टदायक परिस्थिती या सगळ्या त्रासदायक पार्श्वभूमीतून वाट काढत वैभवीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर आज तिला त्याच फळ मिळालं… वैभवीला 85.33 टक्के गुण मिळाले.