Wednesday, February 1, 2023

आठ दिवसानंतर घाटीतील कामगारांच्या उपोषणाला स्थगिती

- Advertisement -

औरंगाबाद | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 164 कंत्राटी कामगारांनी आठ दिवसापूर्वी उपोषण सुरू केले होते. त्यांचा मागण्या बाबत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषण अधिष्ठता डॉ. कानन येळीकर यांनी सेवेत सामावून घेण्याची शिफारस राज्य शासनाकडे केल्या नंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

एका महिन्यापूर्वी 148 दिवसांचे साखळी उपोषण स्थगित करताना आश्वासन न पाळल्याने महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियन संलग्न अटक तर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. प्रशासनाने चार दिवस होऊनही चर्चा न केल्याने कामबंद आंदोलनही करावे लागले होते. अशी माहितीसंघटनेचे राज्य सचिव अॅड. अभय टाकसाळ यांनी दिली.

- Advertisement -

उपोषण स्थळी डॉक्टर कानन येळीकर यांनी येऊन पाणी पाजवून कामगारांचे उपोषण सोडविले. यावेळी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव अॅड. अभय टाकसाळ व पदाधिकाऱ्यांना डॉक्टर केळकर यांनी पत्र दिले. कामगारांच्या या आंदोलनासाठी अभय टाकसाळ, विकास गायकवाड, रतन अंबिलवादे, भालचंद्र चौधरी, अजय सुरडकर, महेंद्र मिसाळ, किरण राज, पंडित नंदा, हिवराळे संगीता, शिरसाट मनीषा आदी उपस्थित होते.