मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणूक लढवावी, आम्ही पाठिंबा देऊ; ‘वंचित’ची खुली ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आपल्या मागण्यांना घेऊन राज्य सरकार विरोधात आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला, “मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल” अशी खुली ऑफर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शरीराचा त्याग करून लढण्याचा अर्थ नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुढील महिन्यात लोकसभेच्या निवडणूकीत कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालन्यात स्वतंत्र्य लढाई लढली पाहिजे. गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही. आम्ही आज सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे”

त्याचबरोबर, “मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. राज्य सरकारने त्यांना अधिवेशनात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिले आहे. आता लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे लवकरच याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे” असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

जागावाटपाविषयी भाष्य

इतकेच नव्हे तर, “40 जागांचं आमचं सेटेलमेंट झालं. आमची शेवटची बैठक झाली, त्यामध्ये आम्ही फायनल मसुदा दिला. त्यामध्ये इतर पक्षांचा मसूदा आला असेल. तर पुढील बैठकीत जागावाटपावर फायनल चर्चा होईल. कोणाला कुठल्या जागा हव्या आहेत ते एका कागदावर लिहू आणि कोणाच्या काय मागण्या आहेत ते सोडवू. जो निर्णय सुटणार नाही त्याचा सगळे बसून निर्णय घेऊयात” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.